विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, July 9, 2018

‘संजू’मध्ये न दाखवण्यात आलेल्या सत्याचं काय? – उज्ज्वल निकम


राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मात्र अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्या नाहीत असंही मत अनेकांनी मांडलं आहे. मग ते त्याच्या पहिल्या दोन पत्नीविषयी असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याच्याजवळ आढळलेले सात हँडग्रेनेड्स असो, अशा काही गोष्टींचा उल्लेखही चित्रपटात का केला नाही असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘संजू’ चित्रपटाविषयी वक्तव्य केलं. १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरी ठेवण्यात आले होते हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.
‘वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलीस संरक्षण होतंच. मग संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्याचं कारण सांगत स्वत:चा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे सुद्धा चित्रपटात दाखवणं आवश्यक होतं. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रं व हँडग्रेनेड्स घेऊन अबू सालेम आला होता, ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध लोकांचे प्राण वाचले असते. याबद्दल त्याला आता काय वाटतं, हेही चित्रपटात दाखवायला हवं होतं,’ असंही ते म्हणाले.
बायोपिक म्हटल्यावर वास्तव गोष्टींचा उल्लेख असणं अपेक्षित असतं, मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी गुन्ह्यांवर पडदा टाकला जाऊ शकत नाही किंवा त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडून चालत नाही, असा टोला त्यांनी दिग्दर्शकांना लगावला आहे.
‘संजू’च्या यशासोबतच असे बरेचसे प्रश्न समोर येत आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं राजकुमार हिरानी किंवा संजय दत्त कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निर्भया प्रकरणातली दोषींची फाशी कायम, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

Tuesday, February 21, 2017

१ एप्रिलपासून जिओचा ३०३ रुपयांचा प्लॅन



'सबकुछ फ्री'ची धमाकेदार घोषणा करत सहा महिन्यांपूर्वी मोबाइल विश्वात मुसंडी मारणाऱ्या आणि १० कोटी ग्राहकांना भुरळ पाडणाऱ्या रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट सेवा ३१ मार्चला बंद होणार आहे. १ एप्रिलपासून जिओ नेटवर्कवरून व्हॉइस कॉल आणि रोमिंग मोफत असेल, पण डेटासाठी नवे टेरिफ प्लॅन सुरू होतील, अशी घोषणा आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली.

३१ मार्चपूर्वी जिओची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना ९९ रुपयांत जिओचं प्राथमिक सदस्यत्व दिलं जाईल आणि या सदस्यांसाठी ३०३ रुपयांचा एक खास प्लॅन असेल, असं अंबानी यांनी जाहीर केलं आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत प्राथमिक सदस्यांना जिओ न्यू इअर ऑफरचा फायदा मिळणार असून ३०३ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये त्यांना अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे.

राजधानीत शिवजयंती २०१७ उत्साहात साजरी

 सर्वांचे लाडके, उदयनराजेनचे कट्टर समर्थक आदरणीय सादिकभाई आणि नगरसेवक अल्लाउद्दीन शेख हे मिरवणुकीत उपस्थित होते.
 शिवरायांचे मावळे सादिकभाई



जय जिजाऊ…जय शिवाजी… अशा जयघोषात ढोल ताश्यांच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या व त्यांची महती सांगणाऱया गडकोटवरुन शहरासह जिल्हय़ातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवदौडीने आणलेला शिवज्योत दिवसभर तेवत ठेवून शिवजयंती मोठय़ा दिमाखदार सोहळय़ाने साजरी करण्यात आली. साताऱयात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वशंज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
 साताऱयातील रविवार पेठेतील चार मंडळांनी, तसेच केसरकर पेठेतील गणेशोत्सव मंडळ, शकुनी गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठेतील शंकर पार्वती गणेशोत्सव मंडळ, सोन्या मारुती मंडळ, फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले भाजी मंडईतील मंडईचा राजा, हिंदु समाज खाटीक संघटना, सोमवार पेठेतील शिवजयंती उत्सव मंडळ, मल्हारपेठेतील योध्दा ग्रुप या विविध मंडळांनी चौका-चौकात भगव्या पताका लावून वातावरण भगवेमय केले होते. शहरात विविध मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमही राबविले होते.
 संभाजी ब्रिगेड साताराच्यावीने शिवतीर्थावर श्री. छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गितांजली विद्यामंदीर येथे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब डेरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष रफिक शेख, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सी. आर. बर्गे, दिपक चोरगे, सदाशिव जाधव, वामन जाधव, बाजीराव देशमुख, युवराज पवार, मयुर आंबवले, दिपक क्षीरसागर, दिपक ढाणे, शिवाजी जाधव, सागर चोरगे, रोहित घंगेकर, शुभम राऊत, उमर शेख, सोमनाथ यादव, अनुप गांगुर्डे, प्रदीप चोरगे, सुरज चव्हाण, तेजस घोरपडे, मोमिन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सर्वांचे लाडके, उदयनराजेनचे कट्टर समर्थक आदरणीय सादिकभाई आणि नगरसेवक अल्लाउद्दीन शेख हे मिरवणुकीत उपस्थित होते.कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार नेताजी कुंभारे, विवेक जाधव हे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवेंद्रराजेंच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल


आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी मारहाण केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी व मेढा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती, फिर्यादी शमसुद्दीन पठाण (वय.24) रा. कमाणी हौद सातारा, धंदा-ड्रायव्हर हा व त्याचा मित्र जयेश शंकरराव देशमुख यांच्या मित्राची असलेली इनोव्हा कार नं. एम.एच.14. 6677 ही गाडी घेवून पावशेवाडी (ता.जावली) येथे राहणारे आनंद पवार यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी आनंद पवार यांचे मित्र आनंद जाधव, मंगेश पवार, ओंकार दिघे, किसन शिंदे हे सर्वजण त्याठिकाणी होते. जेवण झाल्यावर सर्वजण पावशेवाडी येथे असलेली दंडवस्ती येथील चौकात तंबाखु घेण्यासाठी थांबले असता 19 रोजी रात्री सुमारे 12.30 चे दरम्यान सातारा बाजुकडुन 7 ते 8 गाडय़ा येवून आमचे जवळ थांबल्या. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे त्यांच्या गाडीतून उतरले व फिर्यादीजवळ आले. तु कुठला आहेस विचारुन मी सातारचा आहे असे सांगताच काही कारण नसताना माझ्या कानाखाली वाजवली. त्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱया 30 ते 35 कार्यकर्त्यांनीही मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्ये पडलेल्या माझ्या सहकाऱयांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद शमसुद्दीन पठाण याने मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक नलावडे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घटनेची खबर मिळताच पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला व गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी जोरदार मागणी केली. दरम्यान, या प्रकारामुळे जावली तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु असुन मतदारांच्याही व कार्यकर्त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.