विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, July 9, 2018

‘संजू’मध्ये न दाखवण्यात आलेल्या सत्याचं काय? – उज्ज्वल निकम


राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मात्र अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्या नाहीत असंही मत अनेकांनी मांडलं आहे. मग ते त्याच्या पहिल्या दोन पत्नीविषयी असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याच्याजवळ आढळलेले सात हँडग्रेनेड्स असो, अशा काही गोष्टींचा उल्लेखही चित्रपटात का केला नाही असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘संजू’ चित्रपटाविषयी वक्तव्य केलं. १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरी ठेवण्यात आले होते हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.
‘वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलीस संरक्षण होतंच. मग संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्याचं कारण सांगत स्वत:चा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे सुद्धा चित्रपटात दाखवणं आवश्यक होतं. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रं व हँडग्रेनेड्स घेऊन अबू सालेम आला होता, ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध लोकांचे प्राण वाचले असते. याबद्दल त्याला आता काय वाटतं, हेही चित्रपटात दाखवायला हवं होतं,’ असंही ते म्हणाले.
बायोपिक म्हटल्यावर वास्तव गोष्टींचा उल्लेख असणं अपेक्षित असतं, मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी गुन्ह्यांवर पडदा टाकला जाऊ शकत नाही किंवा त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडून चालत नाही, असा टोला त्यांनी दिग्दर्शकांना लगावला आहे.
‘संजू’च्या यशासोबतच असे बरेचसे प्रश्न समोर येत आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं राजकुमार हिरानी किंवा संजय दत्त कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निर्भया प्रकरणातली दोषींची फाशी कायम, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.