महाराष्ट्राची लक्षवेधि आणि दोन्ही राजघरान्यासाठी अस्तित्वाची असणारी आमदार X खासदार अशी सातारा नगरपालिकेचि निवडणूक पार पडली. सर्वात जास्त 22 आणि नगराध्यक्षपद जिंकून उदयनराजेनि आपली आघाडी कायम राखली.
दोन्ही राजेंचे मनोमिलन तुटले आणि दोन्ही राजे एकमेकाविरुद्ध दंड थोपटुन निवडणूक रिंगणात उतरले. नगराध्यक्ष पदासाठी शिवेंद्रराजेनी राणीसाहेब सौ. वेदांतिकाराजे भोसले याना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहिर केली. वेदांतिकाराजे यानि कर्त्यव्य सोशलग्रुपच्या माध्यमातून सातारामध्ये विविध सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांची लोकप्रियता आणि सामाजिक वारसा पाहुन शिवेंद्रराजेनि त्याना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. दुसरीकडे उदयनराजेनि सर्व सामान्यघरातील स्त्री उमेदवार सौ माधवी संजोग कदम याना उमेदवारी जाहिर केलि. सौ कदम याना कुठलाही राजकीय अनुभव नसताना राजेनी त्यांचावर मोठा विश्वास टाकत उमेदवारी जाहिर केलि. बघता बघता निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे वाढली. ऑनलाइन पोल मध्ये सौ. माधवी कदम नेहमीच पुढे होत्या पण सामजिक कार्ये आणि राजकीय अनुभवाच्या पुढे त्या फार मागे होत्या. शेवटी मतदारराजाच कौल ठरवितो आणि अनुभवाने कमी पण उच्चशिक्षित, अर्थशास्त्राचि पदवीधर असलेल्या माधवी कदम याना जनतेने कौल दिला आणि नगराध्यक्ष पद खेचून आले.
सौ. माधवी कदम सातारच्या नगराध्यक्ष 3330 मतांनी विजयी झाल्या.
नगरसेवक उमेदवारी देताना दोन्ही पक्षाकडून मात्तब्बर नेत्यांना नगरसेवकाना डावलण्यात आले होते त्याचा फटकाहि बसला व् काही ठिकाणी नविन उमेदवार निवडून ही आले.
फायनल निकाल : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, बाबाराजे (आ.शिवेंद्रसिंहराजे)नगर विकास आघाडी 12 आणि भाजप 6 अपक्ष 0, मनसे 0.
ताज्या बातम्यांसाठी वाचा.
साप्ताहिक विचारमाध्यम, सातारा
www.vicharmadhyam.com
No comments:
Post a Comment