विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, November 7, 2016

मुलाच्या वाढदिवशी होणार शहीद तुपारेंवर अंत्यसंस्कार, 3 महिन्यांनी होते गुरुसेवकचे लग्न

 
कोल्हापूर/श्रीनगर - जम्मू-काश्मिरच्या शोपियामध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये दोन जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानालाही शहीदत्व आले आहे. राजेंद्र तुपारे असे त्यांचे नाव असून ते कार्वे या गावातील रहिवासी होते. तर शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचे नाव गुरुसेवक सिंह असे होते.
दोन महिन्यांनी होते गुरुसेवकचे लग्न..
मनाला चटका लावून जाणारी बाब म्हणजे, राजेंद्र तुपारे यांच्या मुलाचा मंगळवारी वाढदिवस आहे. म्हणजे मुलाच्या वाढदिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार होतील. तर गुरुसेवक सिंगबाबतही अशीच एक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुरुसेवक याचे लग्न ठरले होते. दोन महिन्यांनंतर म्हणजे 13 फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार होते. आज संध्याकाळपर्यंत राजेंद्र तुपारे यांचा मृतदेह त्यांच्या गावी येणार आहे. तुपारे हे 2002 साली बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. पुंछमध्ये सीमेवर ते तैनात होते.

शोपियांमध्ये लष्कर-पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये एन्काऊंटर झाले. याठिकाणी वनगाम परिसरात फायरिंग झाली होती. 62RR आणि पोलिस जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते. एक दहशतवादीही यात मारला गेला.

दरम्यान, या चकमकीत शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचे नाव गुरसेवक सिंग असे आहे. ते 22 शीख रेजिमेंटमध्ये तैनात होते. तुपारे यांचे पार्थिव दुपारी बेळगाव येथे येणार असून त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी आणले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्य संस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राजेंद्र यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात दोन मुले आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) तसेच आई-वडील आहेत.

No comments:

Post a Comment