बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते. बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.
बदामाचे फायदे.
१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. २.बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.
विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...
Monday, October 31, 2016
बदामाचे फायदे.
Sunday, October 30, 2016
आघड्यांच्या माळा आणि अपक्षांचे सुट्टे फटाके
देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच जिल्हय़ातील शहरांमधे पहिली अंघोळ जयघोषाने झाली. वार्डावार्डातील नेते-पुढाऱयांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाने रात्रीउशिरापर्यंत रस्ते गर्दिने माखून गेले होते. शुक्रवारची रात्रीपासूनच स्थानिक राजकारणाची चक्रे गतिमान झाली होती. याची जिरव-त्याची जिरव करत दिवाळीच्या भल्या पहाटे आघाडय़ांनी उमेदवारांच्या माळा वाजवल्या तर अपक्षांनी आपाले सुट्टे फटाके नेत्यांच्या पायात वाजवले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आठ पालिकांमधे 3,000 जणांनी अर्ज दाखल केले असून यंदा होत असलेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी 100 जणांनी बाशिंग बांधले आहे.
दरम्यान, केंदात आणि राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद स्थानिक पातळीवरही दिसू लागले असून राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सातारा जिल्हय़ात यंदा सेना, भाजपातही चांगला उत्साह जाणवून येत आहे. आता त्यांची डाळ किती शिजणार हे वेगळे असले तरी जिल्हय़ातील सर्वच नेत्यांची अपक्ष व बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी छाननी व 11 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या दिवसांपर्यंत मात्र घोडेबाजाराला ऊत असणार आहे.
साताऱयात दोन्ही राजांच्या आघाडय़ांत होणार घमासान लढाई
साऱया जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या साताऱयातील निवडणूक ऐन रंगात आली आहे. राजघराण्यातील मनोमिलन तुटण्याबरोबरच राजस्नुषा वेदांतिकाराजे भोसले यांची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. अर्ज दाखल करतानाच दोन्ही राजांनी दात-ओठ घाऊन दिलेल्या प्रतिक्रियांमुळे दोन्ही आघाडय़ांमधे घमासान लढाई होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. भाजपानेही या लढाईचा लाभ उठवण्याची पुर्ण तयारी केली आहे.
कराडात माजी मुख्यमंत्री विरूद्ध आमदार अशीच रंगत येणार
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगत राहिलेल्या कराडच्या राजकारणाने निर्णायक वळण घेतले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ति आघाडीकडे राजेंद्रसिंह यादव, जयवंतराव पाटील, अरूण यादव यांच्यासह दिग्गजांची मांदीयाळी वाढल्याने सत्ताधारी लोकशाही आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निकराची लढत देणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यातच अतुल भोसलेंच्या भाजपा व उंडाळकराची तिसरी आघाडी रिंगणात आहेच. त्यामुळे कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरूद्ध आमदार बाळासाहेब पाटील हा संघर्ष आत्ताच निर्णायक वळणवर गेल्याचे मानले जात आहे.
फलटणांत राजे गटाने पुन्ह एकदा डावच गुंडाळण्याची आखली रणनिती
विरोधकांनी पाच वर्ष संघर्ष करायचा आणि ऐनवेळी राजे गटाने खेळी करायची ही रित यंदाही अवंलबण्यात आली. ऐनवेळी विरोधकांचे मोठे नेते आपल्या गटात घेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांच्या राजेगटाने विरोधकांचा डाव मोडित काढल्याचे मानले जात आहे.
कोरेगावकरांनी नेत्यांशिवाय निवडणूक घेतली आपल्या हातात : कोरेगावातील राजकारणाने अंतिम दिवसांपर्यंत आपला रंग झाकुनच ठेवला. काँग्रस पक्ष, राष्ट्रवादी, सेना व भाजपातून अर्ज दाखल झाले असले तरी शनिवारी कोरेगावात कोणत्याही ‘बाहेर’च्या नेत्याला प्रवेश दिला गेला नाही. गावची निवडणूक गावातल्या माणसांमधेच राहिली पाहिजे असा न कळत फतवा निघाला की काय? असा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती होती.
Saturday, October 29, 2016
उदयनराजेंचा यल्गार
सातारा : डिसेंबर मध्ये सातार्यात नागरपालिकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी मनोमिलनाचा भरपूर प्रयत्न झाला पण काही कारणांमुळे सातारा विकास आणि नगरविकास आघाडीने वेगळे वेगळे लढन्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडे काही नगरसेवक आले काही गेले. या रणधुमाळित भाजप व् रासप युति तर मनसेने पण आपले दंड थोपटले आहेत.
उदयनाराजेनि स्वताच्या बळावर 40-0 अशी निवडणूक जिंकून दाखविन्याचा निर्धार केला आहे अन्यथा मी खासदारकिचा राजीनामा देईन असे सुतोवाच केले आहे.
सातारा विकास आघाडीचे माजी नगर अध्यक्ष नासिर शेख नगर विकास आघाडीत सामील
सातारा : सातारा विकास आघाडीने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने मा. नगराध्यक्ष नासिरभाई शेख यांनी तडकाफडकी नगर विकास आघाडीत सामील झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रभाग ६ मधून नगर विकास आघाडीने नगरसेवक जयंवंत भोसले यांच्या पत्नीला तिकीट जाहीर केल्याने या वार्डात रंगतदार लढत होणार आहे. नासिर शेख यांनी गेले १५ वर्षे या वार्डात विकास कामे केल्याने व त्यांना उमेदवारी न दिल्याने येथे कोण कोणाला साथ देतेय हे पाहायला मिळणार आहे.
सातारा विकास आघाडी कडून माजी नगरसेवक व उदयनराजेंचे कट्टर समर्थक अल्लीशेठ शेख यांना या वार्डात उमेदवारी मिळाली आहे. नासिर शेख यांनी आघाडी बदलण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे असे लोकमत समोर आले आहे. पुढे काय काय घडामोडी होतील हे पाहणे मजेशीर आहे.
Wednesday, October 26, 2016
विचारमाध्यमच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...
चिपळूणमध्ये मुस्लिम समाजाचा एल्गार..मुकमोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूणः येथे आयोजित चिपळूण तालुका मुस्लिम मूक मोर्चाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला .आपल्या न्याय हक्कासाठी तालुक्यातील मुस्लिम समाज एकवटला होता.
शहरातील खेडेकर क्रिडा संकुला पासुन या मोर्चाला सुरूवात झाली, तत्पुर्वी प्रमुख वक्त्यानी उपस्थित हजारो बांधवासमोर आपल्या भावना व्यक्त करताना, मुस्लिमाना ५% आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच तल...ाख पध्दतीमध्ये शासनाचा हस्तक्षेप शरीराच्या विरोधात असल्यामुळे सहन केला जाणार याचा प्रामुख्याने उल्लेख केला..हातात तिरंगा व प्रमुख मागण्याचे बँनर्स घेऊन निधालेला हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने कोणतीही घोषणा वा नारेबाजी न करता तहसिलदार कार्यालयात पोहोचला .स्वंयसेवकानी उत्तम जबाबदारी पार पाडली. मोर्चाला सकल मराठा समाजाने पाणी वाटप करुन सहभाग नोंदविला..तहसिलदाराना निवेदन सादर केल्यानंतर राष्ट्रगिताने मोर्चाची समाप्ती झाली......
न्यूझीलंडकडून भारताचा 19 धावांनी पराभव
केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. या दौऱ्यात सूर हरपलेल्या मार्टिन गुप्टीलसह टॉम लॅथमने धडाक्यात सुरवात केली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत 80 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांच्या हाती चेंडू दिला. यामुळे न्यूझीलंडची धावगती कमी झाली. पुन्हा आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नांत अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लॅथमने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला. त्यानंतर केन विल्यम्सन आणि गुप्टील यांनीही चांगली भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडकडून मोठ्या भागीदारी झाल्या नाहीत. भारताकडून अमित मिश्राने दोन गडी, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. रोहित शर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चांगली भागीदारी करत डाव सावरला. ईश सोधीच्या गोलंदाजीवर कोहली 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या साथीत रहाणेने पुन्हा एकदा भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झळकाविल्यानंतर रहाणेही बाद झाला. त्यानंतर भारताचे प्रमुख फलंदाज काहीही कमाल करू शकले नाहीत. फलंदाजीत बढती मिळालेला अक्षर पटेल, अमित मिश्रा, धवल कुलकर्णी आणि उमेश यादव यांनी चांगली झुंज देत भारताला विजयाच्या जवळ नेले. 49 व्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नांत यादव बाद झाला.
संक्षिप्त धावफलक:
न्यूझीलंड : 50 षटकांत 7 बाद 260
मार्टिन गुप्टील 72, टॉम लॅथम 39, केन विल्यम्सन 41, रॉस टेलर 35
भारत : 48.4 षटकांत सर्वबाद 241 अजिंक्य रहाणे 57, रोहित शर्मा 11, विराट कोहली 45, महेंद्रसिंह धोनी 11, अक्षर पटेल 38, मनीष पांडे 12, केदार जाधव 0, हार्दिक पंड्या 9, अमित मिश्रा 14, धवल कुलकर्णी नाबाद 25, उमेश यादव 7
शहराला दिवाळीची चाहूल, खरेदीसाठी गर्दी
आता केवळ तीन दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कपडय़ाबरोबर, उटणे, मोती साबण, तेल याचीही खरेदी जोमात चालली आहे. तर काही जणांचे फराळ करुन पूर्ण झाले आहेत, तर काही जणांच्या घरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. एकंदर शहराला दिवाळीची चाहूल लागली आहे.
दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे चैतन्य आणि दिवाळी म्हणजे नवीन कपडे. दिवाळी आणि नवीन कपडयांचे अतूट असे समीकरण आहे. साडय़ांच्या दुकानात महिलांनी गर्दी केली आहे. सिल्क, पैठणी, शालू असा साडयांपेक्षा डिझानर साडयांना महिला जास्त पसंती देत आहेत. तर तरुणीमध्ये इंडो वेस्टर्न कुडती, मस्तानी ड्रेसला तर तरुणांमध्ये डेनिमचे शर्ट व वॉश, जॉगर्सच्या जीन्सची क्रेझ आहे.
ऑक्टोबर हा थंडीचा महिना. थंडीत आपली त्वचा उकलते. त्यामुळे तेल व उटणे लावून आंघोळ केल्याने त्वचा चांगली राहते. दिवाळी ही थंडीतच येत असल्याने दिवाळीदिवशी तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. अभंग स्नानासाठी बाजारात अनेक प्रकारचे तेल, साबण, उटणे आले आहेत. साबणामध्ये गुलाब, चंदन, मोती साबणाबरोबरच, केवडा, विभूती, अष्टगंध, उपटण, केसर, कोरफड, तुलसी, जास्मिन, खस, पंचामृत, मध असे प्रकार आले आहेत. तसेच उटण्यात घालण्यासाठी हिना, अलफान्सो, रातराणी, गुलाब अशा प्रकारचे अत्तर बाजारात उपलब्ध झाले आहेत. अभंग स्नानासाठी पूर्वी तीळाचे तेल लावले जात होते. परंतु आता बाजारात वेगवेगळे सुगंधी तेल आले आहेत.
मोबाईल, सोशल नेटवर्किंगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रीटिंग्ज कार्डसना पसंती दिली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतला शुभेच्छापर मजकूर असलेल्या ग्रीटिंजना सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जात आहे. दिवाळीत आपल्या आवडत्या व्यक्ती, नातेवाईक, स्नेही यांना ग्रीटिंग पाठवतो. हा एक आनंद उत्सवाचा भाग असतो. तर सातारा शहरातील अनेक गिफ्ट शॉपी मध्ये शुभेच्छा पत्र आले आहेत. तर 25 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत बाजारात ग्रीटिंग उपलब्ध झाले आहेत. त्यांची खरेदीही होत आहे.
कराडची बाजारपेठ फुलली
कराडः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कराडच्या बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्ते ग्राहकांनी फुलले आहेत.
दिवाळी अवघ्या आठवडाभरावर आलेली असतानाही बाजारपेठेत शांतता असल्याने व्यापाऱयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र सोमवारी दुपारनंतर बाजारपेठे ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱयांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी कराडचा बंद दिवस असतानाही दिवसभर बाजारपेठ सुरू होती. तर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.
दिवाळीचे आकर्षण असणारे विविध रंगरीबेरंगी आकाशकंदील, कपडे, रांगोळी, फटाके, पणत्या आदी प्रकारचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. भेदा चौकातील पालिकेच्या मैदानात फटाका स्टॉलसाठी जागा दिली असून येथे मंडप उभारून स्टॉल उभारण्यात आले आहेत. फटाके खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. कपडय़ांची बाजारपेठही ग्राहकांनी फुलली आहे. लहान मुलांच्या कपडय़ांबरोबरच मोठय़ांचाही रेडिमेड कपडय़ांकडे कल दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कपडय़ांच्या दरात नाममात्र वाढ झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.
यावर्षी राज्यभर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या निमित्ताने दिवाळीवरही मराठा क्रांती मोर्च्याची छाप दिसून येत आहे. शहरात लागलेल्या आकाशकंदीलाच्या स्टॉलवर मोठय़ा मराठा आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 20 रूपयांपासून अडीचशे रूपयांपर्यंत वेगवेगळय़ा किमतीत हे आकाशकंदील विकले जात आहेत. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठय़ा प्रमाणात शिरकाव केलेल्या चायना सारख्या परदेशी वस्तुंवर सोशय मिडीयातून मोठय़ा प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला. त्याचा परिणाम बाजारपेठेतील चायना मेड वस्तुवर दिसून येत आहे. यात मोठय़ा प्रमाणात पणत्या, लाईटच्या माळा, फटाक्यांना मार बसला आहे.
सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळानंतर यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱयांसह सर्वस्तरातील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीमध्ये दिसून येत असून मोठी उलाढाल यानिमित्ताने होत आहे.
Tuesday, October 25, 2016
LIVE: भाई समेत बर्खास्त मंत्रियों की वापसी कराएंगे मुलायम, बस थोड़ी देर में PC में करेंगे बड़ा ऐलान
Monday, October 24, 2016
सायरस मिस्त्रींना 'टाटा'; रतन टाटांकडे जबाबदारी
हकालपट्टी बेकायदा सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदा असल्याचा दावा शापूरजी पालोनजी समूहातर्फे करण्यात आला आहे. शापूरजी पालोनजी हे टाटा समूहाचे सर्वांत मोठे समभागधारक आहेत. विशेष म्हणजे पालोनजी यांनीच सायरस मिस्त्री यांना "टाटा सन्स‘चे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी शिफारस केली होती.
Sunday, October 23, 2016
शिवथर(सातारा) येथे घरफोड्या
मनोमीलनाचा ‘सस्पेन्स’ कायम, मनोमिलनाची गाडी अध्यक्षपदावर आडकली
सातारा नगरपालिकेत गेली दोन टर्म मनोमिलन पॅटर्नची सत्ता आहे. यंदा ही मनोमिलन होणार यात तीळ मात्र शंका नव्हती मात्र मुंबईतुन आरक्षण सोडत पध्दतीमध्ये सातारा नगयपालिकेसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. यंदा नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निनवडूण येणार असल्याचे व तो सलग पाच वर्षासाठी असल्याने या पदाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. व नेमके हेच पद दोन्ही आघाडय़ांना सध्या डोकेदुखीचे व जोखमीचे वाटत असल्याने ते आपल्याच ताब्यात रहावे अशी मानोमन इच्छा आहे. नगरविकास आघाडीला 22 तर सातारा विकास आघाडीला 17 व नगराध्यक्षपद मिळावे अशी इच्छा सातारा विकास आघाडीमधील नेतेमंडळीची आहे. तर नगरविकास आघाडी 22 जागा तुम्हाला घ्या व 17 जागा आम्हाला दय़ा व नगराध्यक्षपद आमच्याकडे दय़ा असा निरोप धाडत आहे. त्यामुळे अध्यक्षपदा भोवतीची चर्चा वाढत असुन येत्या दोन-तीन दिवसात त्यावर नक्कीच तोडगा निघेल असे दोन्ही आघाडय़ांना वाटत आहे.
मात्र अध्यक्षपदावरून गाडी पुढेच गेली नाही तर आयत्या वेळी पळापळ नको म्हणून दोन्ही आघाडीतील नेत्यांनी वार्ड निहाय उत्सुकांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे.दोन्ही बाजुंकडे नगराध्यासह 40 उमेदवारांची यादी तयार केलेली आहे. परंतु ती पक्की नाही यामध्ये काही वार्ड सोडले तर अनेक अदला बदल होणार आहे. दोन्ही आघाडय़ांचे प्रयत्न हे मनोमिलन व्हावे याच दृष्टीने सुरू असताना पर्याय म्हणून अथवा एकमेकांवर दबाव तंत्रांचा वापर करण्यासाठी 40 उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
नगरविकास आघाडीतर्फे वेदांतिकाराजे भोसले यांचे नाव चर्चेत असून त्या या पदाला योग्य न्याय देतील असे नगर विकास आघाडीमधील कार्यकर्त्यांना वाटत आहे. कर्तव्य सोशल गुपच्या माध्यमातुन अनेक सामाजिक कामे वेदांतीकाराजेंनी यशस्वी करून दाखवली आहेत. त्यांच्या मध्ये निर्णयक्षमता आहे. बचतगट पर्यावरण महाविद्यालय आदि चौफेर क्षेsत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा मटविला आहे. त्या जर नगराध्यक्ष झाल्या तर सातारा नगरपालिकेला शिस्तीबरोबरच विकासाची कामे झपाटय़ाने होतील तसेच राजघराण्यातील पहिल्याच महिला नगराध्यक्ष म्हणून ही त्यांना मात मिळणार असल्याचे नाविआच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे.
मनोमिलन झाल्यापासुन काहीही झाले तरी मनोमिलन तुटणार नाही असे नेहमीच उदयनराजे भोसले सांगत आले आहेत मनोमिलनावर अनेकवेळा संकटे आली परंतु ते अभेद्य राहिले यंदा मात्र थोडा नाजुक पण तितकाच महत्वाचा प्रश्न मनोमिलनाच्या अडसर बनला आहे. वेदांतिकाराजे भोसले जर नराध्यक्षा झाल्या तर नगरसेवकांची ठेकेदारांची टक्केवारी बंद होणार हे निश्चित तसेच सावियाच्या नगरसेवकांनाही फौजदार घेण्यास वेदांतिकाराजे डगमगणार नाहीत व ते एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षासाठी नगराध्यक्ष म्हणून गकाम करणार हेच मुळी काहीजणांना डोकेदुखीचे वाटू लागले आहे. त्यामुळे टक्केवारी गँग एकत्र येवून नेत्यांचे कान फुंकू लागली आहे व आपली पोळी कशी भाजली जाईल हे पाहत आहेत व नेमके येथेच मनोमिलनाला मेख बसली आहे.
कोहली, धोनीने साकारला भारताचा विजय
न्यूझीलंडला चांगल्या सुरवातीनंतरही भारतासमोर मर्यादितच आव्हान ठेवता आले. त्यांचा डाव 285 धावांत संपुष्टात आला. भारताने 48.2 षटकांत 3 बाद 289 धावा केल्या. विराट कोहलीच्या (नाबाद 154) दीडशतकी खेळीला धोनीच्या 80 धावांची साथ मिळाली.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे ही सलामीची जोडी अपयशी ठरली. पण, या वेळी कोहली आणि चौथ्या क्रमांकावर बढती घेणारा कर्णधार धोनी यांनी नियोजनपूर्ण खेळी करत भारताचा विजय आवाक्यात आणला. विजय समोर दिसत असताना धोनी बाद झाला. त्यानंतर कोहलीने मनीष पांडेला साथीला घेत भारताचा विजय साकार केला. या प्रवासात कोहलीने नाबाद 154 धावांची खेळी करताना धोनीच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पांडेच्या साथीत 75 चेंडूत आक्रमक 97 धावांची नाबाद भागीदारी करून विजय साकारला. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीमधील 26वे शतक साजरे केले.
त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडला सलामीच्या जोडीने चांगली सुरवात करून दिली. मात्र, बदली गोलंदाज केदार जाधवने न्यूझीलंडला पुन्हा चकित केले. त्यांची मधली फळी कोलमडून पडली. त्यांना चांगल्या सुरवातीचा फायदा उठवण्यात अपयश आले. एक वेळच्या 28 षटकांतील 2 बाद 150 अशा स्थितीतून न्यूझीलंडने 27 धावांत पाच गडी गमावले.
न्यूझीलंडची अवस्था 8 बाद 199 अशी झाली. त्या वेळी निशामने मॅट हेन्रीला साथीला घेत भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. नवव्या विकेटसाठी या जोडीने 84 धावांची भागीदारी केल्यानंतर न्यूझीलंडचे आव्हान उभे राहू शकले. निशामने 47 चेंडूत 57 धावांची खेळी केली. हेन्री 37 चेंडूत 39 धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून केदार जाधव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 49.4 षटकांत सर्वबाद 285 (टॉम लॅथम 61 -72 चौकार, 3 चौकार, 1 षटकार, जेम्स निशाम 57 -47 चेंडू, 7 चौकार, रॉस टेलर 44, मॅट हेन्री नाबाद 39, उमेश यादव 3-75, केदार जादव 3-29) पराभूत वि. भारत 48.2 षटकांत 3 बाद 289 (विराट कोहली नाबाद 154 134 चेंडू, 16 चौकार, 2 षटकार, महेंद्रसिंह धोनी 80 -91 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, मनीष पांडे नाबाद 28, मॅट हेन्री 2-56)
मोहाली वनडे - भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Umesh Yadav (1.1-0-6-0)*
Hardik Pandya (1-0-3-0)
विश्वकरंडक कबड्डीत भारत अजेय :
Saturday, October 22, 2016
राज ठाकरेंची खंडणी आम्हाला नको: लष्कर
फडणवीस सरकारची 2 वर्षे- तुमचा शेरा काय?
एटीएमच्या धर्तीवर सातबारा उतारे मिळणार
राज्यात सुमारे तेरा हजार तलाठी कार्यरत आहेत. एकेका तलाठ्याकडे एकापेक्षा अनेक गावांची जबाबदारी असते. मात्र, विविध सरकारी व्यापांमुळे तलाठी उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे नागरिकांना सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाकडे अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. अनेकदा सातबारा उताऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याच्या घटना उघडकीस येत असतात. राज्यात दरवर्षी साधारण चाळीस लाख सातबारा उतारे काढले जातात. ही आकडेवारीच सातबारा उताऱ्यांमधील आर्थिक उलाढालीची कल्पना येण्यास पुरेशी आहे. सातबारा उतारे देण्यात होत असलेली ही आर्थिक फसवणूक टाळण्यासोबत इतर गैरप्रकार रोखून वेळ आणि पैसे वाचवणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
अवघ्या 23 रुपयांना सातबारा
राज्य सरकारच्या ई-महाभूमी या "आपले सरकार‘शी लिंक असलेल्या पोर्टलवर गेल्यानंतर वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड, जिल्हा, आधार क्रमांक, शेतजमिनीचा सर्व्हे क्रमांक आणि पेमेंट गेट-वेमधून पैसे भरल्यानंतर तत्काळ सातबारा उताऱ्याची प्रिंट शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. अशारीतीने सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्याला अवघे 23 रुपये द्यावे लागणार आहेत, त्यामुळे वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे.
निखीलजी वागळे आपले अभिनंदन ..!
आपली ओळख नेहमी एक निर्भीड पत्रकार आणि सडेतोड बाणा आपल्या कार्यातून दिसतो.
हा माकड अभय वर्तक जातीय दंगली भडकवण्याचे काम नेहमी करतो आणि त्याने आपल्या व्यासपीठावरून जे मुस्लिम समाजावर जे खोटे आरोप केले आहेत त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणार.
आपण अगदी प्रखरपणे त्याला विरोध करुन आपल्या शो मधून हाकलून दिले हे अतिशय महत्त्वाची कामगिरी करून दिली आणि आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले जातीयवादी लोकांना आपण कसा धडा शिकवता....
यांच्यावर राज्यातून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे.
मराठा -मुस्लिम भावांचे प्रेम ह्या माकडाला पहावेना...
https://www.facebook.com/ashraf.wankar/videos/1303915209642111/
Posted By : Ashraf Wankar (Awami Vikas Party)
हा मनसेच्या आंदोलनाचा विजय- राज ठाकरे
'ऐ दिल है' चित्रपट प्रदर्शनाला 'मुश्किल' नाही
Friday, October 21, 2016
कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......
तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते.
मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले .
कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला.
मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो.
कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो .
पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .
स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो .
थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.
एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती .
त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले .
मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले.
तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.
,
,
,
,
जीवनाची ही खरी सच्चाई आहे
,
लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही
,
जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवाला की तुम्ही मागे केलेली मदत ते विसरुन तेच लोक तुमची निंदा चालु करतात
,
त्याकरीता तुम्ही तुमचे कर्म करत चला , कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......
मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची फसवणूक- राणे
Thursday, October 20, 2016
रायगड MIDC मध्ये स्फोट; 4 जखमी
रिलायन्स 'जिओ वेलकम ऑफर' 3 डिसेंबरपर्यंतच
कॉलिंग आणि डाटा पूर्णपणे मोफत असल्याने ‘जिओ‘समोर इतर स्पर्धक कंपन्यांची दमछाक झाली आहे. दीड महिन्यात मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी करून ग्राहक जिओकडे आकर्षित होत आहे. मात्र जिओचे कमर्शिअल टॅरिफ प्लान लागू झाल्यानंतर दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये खरी स्पर्धा निर्माण होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.











