शिवथर येथे पाच घरफोड्या
शिवथर, ता. सातारा येथे शनिवारी चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरफोड्या केल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती पैसे अथवा दागिने असा काहीच ऐवज न लागल्याने त्यांनी किंमती कपडे लंपास केली.
शिवथर येथे चोरट्यांनी एकाच ठिकाणची बंद असलेली घरे कटावणीच्या सहाय्याने कडीकोयडे तोडून प्रथम आजूबाजूच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या. प्रथम सुनील नारायण साबळे यांच्या पानटपरीचे कुलूप तोडून 1 हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर शेजारीच विजय उत्तम साबळे यांचे बंद घर फोडले. परंतु तेथे हाती काहीही न लागल्याने शेजारील बंद असलेले भानुदास हरी साबळे व सुभाष हरी साबळे या भावांची घरे फोडली व सर्व सामानाची नासधूस केली. सुभाष साबळे यांच्या घरातील कटावणीने कपाट फोडून त्यामधील किंमती कपडे चोरली. सुभाष साबळे यांच्याच घरात पानपट्टीमधील चोरून नेल्याची चिल्लर मोजून 50 पैशाची नाणी तिथेच ठेवून त्याच घरासमोरील सुरेश शंकर साबळे यांची धान्य ठेवण्याची खोली फोडण्यात आली. त्याही ठिकाणी हाताला काहीच न लागल्याने चोरटे पसार झाले.
पहाटे पाच वाजता सुभाष साबळे यांचा भाऊ अनिल साबळे यांना घराची दारे उघडी असल्याचे निदर्शनास आले. घटना घडल्यानंतर सकाळी पोलिस पाटील भारत साबळे यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे असे वार्ताहार कडून समजले.
No comments:
Post a Comment