विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, October 31, 2016

बदामाचे फायदे.

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते. बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.
बदामाचे फायदे.
१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. २.बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

No comments:

Post a Comment