मुंबई : मोबाईल सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा करणारी ‘जिओ वेलकम ऑफर‘ रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत ‘वेलकम ऑफर‘ सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत नसल्याने दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आदेशामुळे कंपनीला ‘वेलकम ऑफर‘ 3 डिसेंबरपर्यंतच सुरू ठेवता येईल. दरम्यान वेलकम ऑफर बंद होणार असली तरी 3 डिसेंबरपर्यंतच्या जिओ सिमकार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत व्हॉइस आणि डाटा मोफत मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
जिओने 5 सप्टेंबरला ‘वेलकम ऑफर‘ जाहीर केली. ग्राहकांना जिओ सिमकार्ड घेऊन 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची संधी होती. मात्र इतक्या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या "वेलकम ऑफर‘वर इतर कंपन्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी दूरसंचार नियामकाकडे या विरोधात धाव घेतली. मोफत कॉलिंग आणि डाटाबाबत दूरसंचार विभागाने जिओला क्लीनचीट दिली असली "वेलकम ऑफर‘ 31 डिसेंबरपर्यंत राबवता येणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना ‘वेलकम ऑफर‘नुसार मोफत कॉलिंग आणि डाटा योजनेत सहभागी होता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यानंतर जिओ नेटवर्कमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना नव्या योजनेनुसार कॉल दर लागू केले जातील.
खरी स्पर्धा कमर्शिअल टॅरीफनंतरच
कॉलिंग आणि डाटा पूर्णपणे मोफत असल्याने ‘जिओ‘समोर इतर स्पर्धक कंपन्यांची दमछाक झाली आहे. दीड महिन्यात मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी करून ग्राहक जिओकडे आकर्षित होत आहे. मात्र जिओचे कमर्शिअल टॅरिफ प्लान लागू झाल्यानंतर दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये खरी स्पर्धा निर्माण होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment