विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, November 28, 2016

सातारा उदयनराजेंचाच, सांगलीत जयवंतरावाना हादरा, कोल्हापुरात सतान्तर...




महाराष्ट्राची लक्षवेधि आणि दोन्ही राजघरान्यासाठी अस्तित्वाची असणारी आमदार X खासदार अशी सातारा नगरपालिकेचि निवडणूक

महाराष्ट्राची लक्षवेधि आणि दोन्ही राजघरान्यासाठी अस्तित्वाची असणारी आमदार X खासदार अशी सातारा नगरपालिकेचि निवडणूक पार पडली. सर्वात जास्त 22 आणि नगराध्यक्षपद जिंकून उदयनराजेनि आपली आघाडी कायम राखली.

दोन्ही राजेंचे मनोमिलन तुटले आणि दोन्ही राजे एकमेकाविरुद्ध दंड थोपटुन निवडणूक रिंगणात उतरले. नगराध्यक्ष पदासाठी शिवेंद्रराजेनी राणीसाहेब सौ. वेदांतिकाराजे भोसले याना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहिर केली. वेदांतिकाराजे यानि कर्त्यव्य सोशलग्रुपच्या माध्यमातून सातारामध्ये विविध सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांची लोकप्रियता आणि सामाजिक वारसा पाहुन शिवेंद्रराजेनि त्याना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. दुसरीकडे उदयनराजेनि सर्व सामान्यघरातील स्त्री उमेदवार सौ माधवी संजोग कदम याना उमेदवारी जाहिर केलि. सौ कदम याना कुठलाही राजकीय अनुभव नसताना राजेनी त्यांचावर मोठा विश्वास टाकत उमेदवारी जाहिर केलि. बघता बघता निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे वाढली. ऑनलाइन पोल मध्ये सौ. माधवी कदम नेहमीच पुढे होत्या पण सामजिक कार्ये आणि राजकीय अनुभवाच्या पुढे त्या फार मागे होत्या. शेवटी मतदारराजाच कौल ठरवितो आणि अनुभवाने कमी पण उच्चशिक्षित, अर्थशास्त्राचि पदवीधर असलेल्या माधवी कदम याना जनतेने कौल दिला आणि नगराध्यक्ष पद खेचून आले.
सौ. माधवी कदम सातारच्या नगराध्यक्ष 3330 मतांनी विजयी  झाल्या.

नगरसेवक उमेदवारी देताना दोन्ही पक्षाकडून मात्तब्बर नेत्यांना नगरसेवकाना डावलण्यात आले होते त्याचा फटकाहि बसला व् काही ठिकाणी नविन उमेदवार निवडून ही आले.

फायनल निकाल : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, बाबाराजे (आ.शिवेंद्रसिंहराजे)नगर विकास आघाडी 12 आणि भाजप 6  अपक्ष 0, मनसे 0.

ताज्या बातम्यांसाठी वाचा.
साप्ताहिक विचारमाध्यम, सातारा
www.vicharmadhyam.com

विजय पराजय...

ज्ञानेश्वर फरांदे , लता पवार , शकील बागवान (NV), संगीता धबधबे विजयी(NV),
जयेंद्र चव्हाण (NV)पराभूत.....
दत्ता बनकर(SV) आणि अविनाश कदम पराभूत
आत्तापर्यंत साताऱ्यात भाजपला 5 जागा..... धनंजय जांभळे ,प्राची शहाणे, विजय काटवटे, सिद्धी पवार, आशा पंडित
योगेश चोरगे पराभूत तर
आंबेकर 54 मतांनी विजयी
सविता फाळके विजयी
 

फायनल रिजल्ट-सातारा विकास आघाडीची शिट्टी वाजली

सातारा विकास आघाडीची शिट्टी वाजली
सौ. माधवी कदम सातारच्या नगराध्यक्ष 3330 मतांनी विजयी, त्यांनी आमदार पत्नी वेदान्तिकाराजे भोसले यांचा पराभव केला.
निकाल : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, बाबाराजे नगर विकास आघाडी 12 आणि भाजप 6 ,



Saturday, November 26, 2016

उदयनराजेंचि तोफ धडाडलि, रेकॉर्डब्रेक गर्दी

सर्वांच्या उस्तुकतेची सभा आज गांधीमैदानावर संपन्न जाली. उदयनराजेंनि आपल्या ख़ास स्टाईल मध्ये स्टेजवर येताच लोकामधुन शिट्टी आणि टाळ्यांचा आवाज गगनाला भिड़त होता. सौ. माधविताई कदम या सर्वसामान्य घरातील असल्यामुळे त्याना अगदी तळापासून सर्वसामान्य जनतेच्या अडचनिचि जान आहे हे राजेनि नम्रपने सांगितले. Ad. बनकर यानी प्रथम सातारच्या कामाचा लेखा जोखा मांडला.
खासदारानी आणि आमदारानी किती फंड खर्च केले हे आकडेवारित नमूद करुण सर्वाना चकित केले. राजेना विरोधकांनी दरोडेखोर संबोधले त्यावर राजे म्हणाले" होय मी आहे दरोडेखोर पण पैशाचा नाही सातारच्या जनतेच्या हृदयचा. सातारच्या विकासाचा आराखडा भावी नगराध्यक्ष माधविताई कदम नी सादर केला. राजेनि 40-0 चा यलगार परत एकदा दाखवून दिला.
उद्या मतदान आणि सोमवारी मत मोजनी असून लोकांच्या उस्तुकतेला सिमा राहिलेली नाही. बघुया वेळ आणि काळच् सर्व दाखवून देईल....

Wednesday, November 23, 2016

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बोपर्डी (ता. वाई) येथे राहत्या घरात मंगळवारी पहाटे 4.30 वाजता पती अरुण परबती बिरामणे (वय 37, रा. वाघजाईवाडी ता. वाई) याने धारदार चाकूने पत्नीच्या छाती, पोटावर, हातावर वार करून तिचा निर्घृण खून केला. दरम्यान, सौ. नीलम (वय 27) हिच्यावर चाकूने वार होत असताना तिला सोडवण्यासाठी गेलेली तिची बहीण वर्षा दत्तात्रय जाधव वय 25 हिच्या तोंडावर, हातावर, दंडावर वार केल्याने तीही गंभीर जखमी झाली. पोलिसांनी संशयित अरुण बिरामणेस अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरुण व सौ. नीलम हे मूळचे बिरामणेवाडी वालुथ, (ता. जावली) येथील  राहणारे असून त्यांची वाघजाईवाडी येथे शेतजमीन आहे. अरुण हा शेती करुन वाईत एका दुकानातही काम करत होता तर सौ. नीलम व वर्षा या बोपर्डी येथे ज्ञानेश्‍वर गाढवे याच्या खोलीत भाड्याने अडीच वर्षांपासून रहात होत्या. त्या दोघीही वाई औद्योगिक वसाहतीतील गरवारे वॉल रोप्स कंपनीत कामाला होत्या. या दरम्यान अरुण अधूनमधून बोपर्डी येथे पत्नीला भेटण्यास जात असे. मात्र, तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन अरुणने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता.सोमवारी रात्री अरुण  बोपर्डी  येथे मुक्कामी   आला होता. पहाटे 4.30 वाजता त्याने पत्नी सौ. नीलम झोपेत असताना चाकूने तिच्यावर वार केले. तिला सोडवण्यासाठी गेलेल्या वर्षावरही त्याने वार केले. यावेळी दोघींच्या किंचाळण्याच्या आवाजाने शेजारी राहणारे घरमालक ज्ञानेश्‍वर गाढवे व आनंद गाढवे घराबाहेर येवून घराची कडी वाजवू लागले. त्यावेळी अरुण याने आतून आवाज दिला व सांगितले की, ‘मी माझ्या पत्नीचा खून केला आहे व पोलिस आल्याशिवाय दार उघडणार नाही.’ यावेळी ज्ञानेश्‍वर व आनंद यांनी त्यांच्या दोन खोल्यांमधील असलेले पत्र्याचे पार्टीशन उपसून पलीकडच्या खोलीत प्रवेश केला. यावेळी अरुणने हातातील चाकूसह घराची कडी उघडून पळ काढला. यावेळी तेथील पत्रा लागून त्याच्या उजव्या हाताला व पायाला गंभीर जखम झाली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी वर्षा हिस शासकीय  रुग्णालयात दाखल केले. संशयित अरुण बिरामणेला बोपर्डी येथून आणून त्याच्यावर उपचारनंतर अटक केली. सौ. नीलम हिस सिद्धेश (वय 9) व शुभम (वय 6) अशी दोन मुले आहेत. तिला आई-वडील नाहीत. एक लहान भाऊ आहे. या खुनामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून याबाबत घरमालक ज्ञानेश्‍वर गाढवे रा. बोपर्डी यांनी वाई पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पुढील तपास सपोनि होवाळ करत आहेत. घटनास्थळी पोनि विनायक वेताळ, पोनि सोनावणे, पो. उप नि. कदम यांनी भेट दिली. जखमी वर्षावर डॉ. मोहन पाटील, डॉ. किरण मंगवडे, डॉ. संघरत्न कांबळे उपचार करत आहेत.

काळा पैसा पांढरा केला; बँक ऑफ महाराष्ट्रचे तीन कर्मचारी निलंबित

लातूर - उदगीर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील चार कर्मचाऱ्यांनी कमिशन घेऊन सुमारे १९ लाखांची रक्कम बदलून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या चौघांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त असून शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापकांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.
जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर देशभरातील बँक कर्मचारी लोकांच्या सोयीसाठी अतिरिक्त काम करून सेवेत असतानाच उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील चार कर्मचाऱ्यांनी ही संधी समजून उखळ पांढरे करून घेतले. ३० टक्के दराने १००० आणि ५०० च्या नोटांऐवजी जुन्या १०० च्या नोटा देण्याचा काळा धंदा सुरू असल्याचे कळताच बँक कर्मचारी विकास कदम याच्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना तब्बल १९ लाख रुपये बदलून दिल्याची माहिती आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाखा व्यवस्थापकाने ही माहिती लातूरमधील वरिष्ठांना दिली; परंतु त्यांच्या स्तरावरून कसलीच कारवाई झाली नाही. त्यानंतर ही माहिती पुण्यातील मुख्य कार्यालयात देण्यात आली. तेथून आलेल्या पथकाने तातडीने कारवाई करून चौघांना निलंबित केले.

काँग्रेसच्या आंदोलनानंतर नावे जाहीर
आरोपी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे पाहून काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोषी कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक चंद्रकांत दवणे यांनी विशाल कदम, शिवरत्न आघाव, रियाज कासार आणि नरसाबाई मुंडे अशी नावे जाहीर केली. त्यांनी विशाल देवणे या व्यापाऱ्याला सुमारे १८ ते १० लाख दिल्याचे समजते. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत बँकेकडून फिर्याद देण्यात आली नव्हती.

वरिष्ठही सामील? : या प्रकरणात लातूर येथील काही वरिष्ठही सामील असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एकाही जबाबदार अधिकाऱ्याने मंगळवारी दुपारपर्यंत ठाण्यात फिर्यादही दिलेली नाही. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे. शाखा व्यवस्थापकाने आपल्या शाखेतील सर्व नोटांचे हिशेब घेतले नाहीत काय? देशभरात नोटांवरून कल्लोळ सुरू असताना बँकेचे अधिकारी इतक्या निष्काळजीपणे कसे वागले? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
वरिष्ठांची लपवाछपवी : सोमवारपासूनच बँकेच्या कर्मचाऱ्यांत याबाबत कुजबुज सुरू होती. मात्र, ही माहिती बँकेबाहेर कुणालाही देण्यात येऊ नये, अशी तंबी लातूरमधील वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना दिल्याचे समजते. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचे कळाल्यानंतर लातूरमध्ये असलेल्या बँकेच्या विभागीय कार्यालयाचे प्रमुख महेश बन्सवानी यांनी पत्रकारांना कसलीच माहिती दिली नाही. पुण्यातील मुख्य कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्या, एवढे एकच पालुपद त्यांनी आळवले. आरोपी कर्मचाऱ्यांना याच कार्यालयात दडवून ठेवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याबाबत माहिती विचारल्यानंतर पत्रकारांनाच दमदाटी करण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची मजल गेली. पुण्यात संपर्क साधल्यानंतरही तेथे केवळ फोन इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यातच चार तास खर्ची झाले. मात्र, माहिती कुणीही दिली नाही.

नोटबंदीच्या निर्णयावर 'अर्थक्रांती'चे प्रणेते अनिल बोकील नाराज

अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी नोटबंदीबाबत पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नोटबंदीसाठी आम्ही जसा प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे तो सरकारनं लागू केला नाही.’ असं म्हणत बोकील यांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं दिलं आहे.

सरकारनं नोटबंदीचा प्रस्ताव तर मान्य केला पण तो अर्धवट मान्य केला. त्यामुळे अनिल बोकील पंतप्रधान मोदींची पुन्हा एकदा भेट घेणार.

अनिल बोकील यांनी जुलैमध्ये मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी त्यांनी पाच प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर मांडले होते. ज्यामधील सरकारनं केवळ दोनच गोष्टी लागू केल्या. त्यामुळेच जनतेला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. असं बोकील यांचं म्हणणं आहे.

अनिल बोकिलांनी दावा केला आहे की, त्यांच्या संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या रोडमॅपनुसार अंमलबजावणी झाली असती तर लोकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. सरकारनं नोटबंदीसोबत केंद्र ,राज्यात लागू असलेली करप्रणाली बंद करणं गरजेचं होतं. पण तसं न करता फक्त नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला.

नोटाबंदीसाठी अनिल बोकीलांनी मांडले होते हे मुद्दे:

1. आयकरासहित एकूण ५६ प्रकारचे कर रद्द करावे. फक्त  आयात कर कायम ठेवण्यात यावा.

2. बँक ट्रॅन्जॅक्शन टॅक्स हा एकच कर असावा. तो कर जास्तीत जास्त २ टक्के आणि कमीतकमी ०.७ टक्के असावा.

3. चलनात असलेल्या मोठ्या नोट्या म्हणजेच 1000, 500 आणि 100च्या नोटा चलनातून रद्द कराव्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडेल.

4. सर्व आर्थिक व्यवहार एका मर्यादे पलीकडे बँकेमार्फत करण्याची सक्ती करावी.

5. रोख पैशांच्या व्यवहारावर मर्यादा घालण्यात यावी.

Monday, November 14, 2016

नव्या वर्षात जुन्या फोनवर चालणार नाही व्हॉट्सअॅपची 'वटवट'

आपल्याकडे स्मार्टफोन असल्याचा आनंद प्रत्येकाला असतो. मात्र, स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणारी अॅप्लिकेशन्स सतत अपडेट होत असल्याने कधी-कधी फोन बदलावे लागतात. आता व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या अनेक जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनधारकांनाही जानेवारीपासून नवे मोबाइल घ्यावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या चॅट अॅपमध्ये नवीन फीचर्स आणल्याने अनेक जुन्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. व्हॉट्सअॅपने आपल्या साइटवर याची माहिती देताना विंडोज आणि अँड्राइड फोनची यादी देऊन यावर हे अॅप वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. देशात जवळजवळ ९५ टक्के स्मार्टफोनधारक हे व्हॉट्सअॅप वापरत आहेत.
जगातील प्रत्येक सात व्यक्तींमागे एक व्यक्ती सध्या व्हॉट्सअॅप हे चॅट अॅप वापरत आहे. या चॅट अॅपने संपूर्ण जगाला वेड लावले असून आजची तरुणाई याशिवाय राहूच शकत नाही, अशी स्थिती आहे. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहून अनेक चॅट अॅप बाजारात आले. मात्र, त्यांना व्हॉट्सअॅपला टक्कर देणे जमले नाही. बदल केले नाहीत तर बाजारातून बाहेर पडावे लागेल हे लक्षात आल्याने व्हॉट्सअॅपने नवीन हेवी आणि हायटेक फीचर्स तयार केले असून ते बीटा प्लॅटफॉर्मवर आहेत. हे अपडेट कॅमेरा आणि फोटोसाठी आहेत. यात फोटो एडिटिंगसह व्हिडिओ एडिटिंगची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन फीचर्स अपडेट करावे लागणार आहेत. मात्र, सर्वच स्मार्टफोनधारक या फीचर्सचा वापर करू शकणार नाहीत.

नवीन फीचर्स
व्हॉट्सअॅपवर एखादा फोटो काढून फोटो पाठवायचा असल्यास फोटोवर क्रॉपसह अन्य पर्याय दिसतील. यात स्मायली, टेक्स्ट आणि पेन्सिल आहे. फोटोत स्मायली वापरता येणार असून टेक्स्टही टाइप करता येणार आहे. पेन्सिलच्या माध्यमातून डुडल तयार करता येईल. तसेच व्हॉट्सअॅपने फ्रंट फ्लॅश हे फीचरही आणले आहे. अंधुक प्रकाशात चांगला सेल्फी घेण्यासाठी फ्रंट फ्लॅश हे फीचर अपडेट करण्यात येईल. हे अपडेट सध्या बीटा व्हर्जन २.१६.२६४ वर उपलब्ध आहे.
हे फोन होणार बाद
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयफोन, नोकिया, सिंबियन, विंडोज ७.१, ब्लॅकबेरी आणि अँड्राइड २.१ ऑपरेटिंग सिस्टिमवर हे अपडेटेड अॅप चालणार नाही. या यादीत सिंबियन सोबत ब्लॅकबेरी, नोकियाची S४० सिरीज , नोकिया सिम्बियन s६०, अँड्रॉइड २.१, अँड्रॉइड २.२ आणि विंडोज फोन ७.१ ओएसवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा समावेश आहे. आयफोन ३ जीएस आणि आयओएस ६, ब्लॅकबेरी, ब्लॅकबेरी १०, नोकिया ई ६, नोकिया सी ५,नोकिया आशा ३०६, नोकिया ई २, नोकिया एस ४०, नोकिया सिंबियन एस ६० या ऑपरेटिंग सिस्टिमवर नवीन अपडेटेड व्हॉट्सअॅप अॅप चालणार नाही.

नविआची काठी,साविआची शिट्टी

पालिकेच्या निवडणूकीमध्ये रंगत येवू लागली आहे. चिन्ह वाटपामध्येही निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी आघाडय़ांना प्राधान्य देत सुरुवातीला त्यांना चिन्हे दिली. प्रत्येक प्रभागनिहाय अपक्षांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. नगरविकास आघाडीने चालण्याची काठी तर सातारा विकास आघाडीने शिट्टी या चिन्हांना पसंती दिली. भाजपाचे कमळ, शिवसेनेचा धनूष्यबाण, रासपची कपबशी, भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी टोपली अशी चिन्हे वाटप करण्यात आली. त्यामुळे आता मतदारांपर्यंत आपले चिन्हे पोहचवण्यामध्ये उमेदवारांना सोपे जाणार आहे.
चिन्हवाटपासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
सातारा पालिकेच्या निवडणूकीत दोन्ही आघाडय़ा कोणते चिन्हे मागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे यावेळी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वीच दोन्हीही आघाडय़ाशिवाय भाजपा, शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली.
 निवडणूक चिन्हांचे वाटप करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी आघाडय़ांना प्राधान्य दिले गेले. त्यावेळी अपक्ष उमेवादर शंकर माळवदे यांनी आक्षेप नोंदवला. आघाडय़ा अधिकृत आहेत का?, याची सर्व कागदपत्रे आम्हांला दाखवा, अशी मागणी शंकर माळवदे यांनी यावेळी केली. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांनी कागदपत्रे दाखवली.

निर्णय अधिकाऱयांचि चिट्ठी
मागणी केल्याप्रमाणे सातारा विकास आघाडीला शिट्टी तर नविआला चालण्याची काठी देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या चिन्हवाटपावेळी रासप आणि महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी कपबशी हे चिन्ह मागितले. दोघांकडून एकच चिन्ह मागणी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी चिट्ठी टाकली. या चिठ्ठीमध्ये कपबशी हे चिन्हे रासपच्या उमेदवाराला मिळाले.
तर महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या उमेदवाराला टोपली हे चिन्ह दिले गेले. यावेळी पालिकेसाटी लढणाऱया अपक्ष उमेदवारांनी छताचा पंखा, बॅट, नारळ, जग, रोडरोलर, कात्री ही चिन्हे घेण्यात आली. चिन्हे वाटपामध्ये कोणताही घोळ होवू नये, यासाठी उमेदवार, आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
रात्री 10 वाजता नोटीस
निवडणूक चिन्हाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आयोजित केला असल्याची माहिती देण्यासाठी चक्क रात्री 10 वाजता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱयांनी उमेदवारांचे दार ठोठावले. त्यांना सकाळी 11 वाजता उपस्थित रहा, अशी विनंती नोटीसीद्वारे दिली.
 

सातारा थंडीने गारठला

दिवाळी संपल्यानंतर लगेच चार दिवसानंतर हवेत गारठा वाढू लागला असून साताऱयातही गारठा आहे. सायंकाळी पाच वाजताही थंडीचा जोर वाढत जावून मध्यरात्रीपर्यंत कमालीची थंडी नागरिकांना जाणवत आहे. गुलाबी थंडीचे ठिकाण असलेले महाबळेश्वरमध्येही 15 अंशावर थंडी गेली आहे. उबदार कपडयांना मोठी मागणी वाढली आहे. साताऱयातील बाजारपेठेत उबदार कपडय़ांची विक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.
सातारा जिह्यामध्येही थंडी गेल्या सहा दिवसांपासून जाणवू लागली आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सध्या पिक काढणीची कामे जोमात सुरु असून ही कामेही सायंकाळी 5 वाजताच बंद करुन शेतकरीवर्ग घराकडे परतू लागला आहे. सांयकाळी शेकोटय़ा पेटत आहेत. शहरातही थंडीची जाणीव सायंकाळी पाच वाजता होत असून थंडीची तीव्रता पहाटेपर्यंत वाढत जात आहे. सातारा शहरातील तापमानाची नोंद कमाल 27 तर किमान 16 अंश अशी झाली आहे. शहरामध्येही थंडीची चाहूल लागल्यामुळे राजवाडा, बसस्थानक परिसरातील कापड दुकानांमध्ये उबदार कपडय़ांना मोठी मागणी आहे. त्यामध्ये स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांना मागणी होत असून बॅण्डनुसार किमती आहेत.गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. तसेच सायंकाळी वाढत असलेल्या थंडीमुळे दमा, खोकला,अंगदुखी यासारखे विकार वाढू लागले आहेत. त्यामुळे दवाखान्यांच्यासमोर रुग्णांची गर्दी दिसत आहे. 

उबदार कपडे
थंडीपासून प्रत्येकाने संरक्षण केले पाहिजे. उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. ज्यांना सर्दीचा त्रास होत आहे. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार गरम वाफारा घेणे गरजेचे आहे. सकाळी थोडासा व्यायाम करणे गरजेचे आहे.

 

बँकेमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचवली कॅश, आता 24 नोव्हेंबरपर्यंत चालतील 500/1000 रुपयांच्या नोटा

५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी सोमवारी थोडा दिलासा देणारी बातमी. सरकारने निवडक ठिकाणी जुन्या नोटांची वैधता आणखी १० दिवसांनी वाढवली. शिवाय बँकांत लवकर नोटा पोहोचाव्यात म्हणून हेलिकॉप्टरद्वारे नोटांचा पुरवठा सुरू केला आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने रांचीला नोटा पोहोचवल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री नोटबंदीच्या मुद्द्यावर बैठक घेतली. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आर्थिक विषयाचे सल्लागार शक्तिकांत दास यांनी सोमवारी सांगितले की, ५०० व १००० च्या जुन्या नोटांच्या वैधतेचा कालावधी आणि व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता या नोटा सरकारी रुग्णालये, खासगी मेडिकल स्टोअर्स, रेल्वे तिकीट बुकिंग काउंटर, पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, वीज- पाणी बिल, सहकार स्टोअर, दूध केंद्र आणि स्मशानभूमीत स्वीकारल्या जातील. शिवाय १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोलमुक्ती देण्यात आली असून २१ नोव्हेंबरपर्यंत विमानतळावर पार्किंग शुल्कातूनही सूट दिली आहे.
दरम्यान, नोटबंदीचे राजकारणही पेटले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेले भाषण हा सर्वसामान्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
आज एटीएममध्ये मिळतील २००० च्या नोटा
२००० रुपयांच्या नोटा मंगळवारपासून एटीएममधून मिळतील. त्यासाठी कॅलिब्रेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. एटीएमवरील गर्दी कमी करण्यासाठी सरकार मायक्रो एटीएमही बसवणार आहे.
अॅडव्हान्स पगार दिल्याने कमी होईल समस्या
सरकार व खासगी संस्थांनी कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्समध्ये नगदी पगार द्यावा. ५०० रुपयांच्या नव्या नोटांद्वारे पगार देण्यात यावा. त्यामुळे बाजारातील रोख रकमेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल

सहकारी बँकांतून बदलता येणार नाहीत नोटा
सहकारी बँकांत नोटा बदलण्यात गडबड होऊ शकते, अशी शंका सरकारला असल्यामुळे या बँकांना नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आली नाही. मात्र या बँकांतून लोकांना पैसे काढता येऊ शकतील.

मुंबईसह हरियाणा आणि पंजाबमध्ये रांगा लांबल्या
पंजाब- हरियाणा व मुंबईसह अनेक भागात सोमवारी गुरुनानक जयंतीच्या सुटीमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे एटीएमसमोर रविवारपेक्षाही सोमवारी रांगा लागल्या. पैसे काढण्याची मर्यादा २५०० रुपये केल्याने एटीएममधील कॅशही संपली.

श्रद्धा कपूरने पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला स्टेजवर बोलावलं ......

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपल्या ‘रॉक ऑन 2’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासादरम्यान एक वेगळाच अनुभव श्रद्धाला आला. शिवाय, या अनुभवाची सध्या चर्चाही सुरु आहे.
श्रद्धा कपूर ‘यारों की बारात’च्या सेटवर ‘रॉक ऑन 2’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. मात्र, तिथल्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला श्रद्धाने स्टेजवर बोलावले आणि तेथील उपस्थितांना तिने त्या व्यक्तीची ओळख करुन दिली. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीची गळाभेट घेऊन पुन्हा आपल्या जागेवर बसण्यास श्रद्धाने सांगितले.
ज्या व्यक्तीला श्रद्धाने स्टेजवर बोलावले होते, ती व्यक्ती काही वेळापासून श्रद्धाचा पाठलाग करत होती. श्रद्धा प्रमोशनसाठी ज्या ठिकाणी जात होती, तिथे ती व्यक्ती हजर राहत होती. यादरम्यान तब्बल 17 वेळा त्या व्यक्तीला श्रद्धाने पाहिले. अखेर ‘यारों की बारात’च्या स्टेजवर बोलावून आपल्या या वेगळ्या चाहत्याचा तिने योग्य सन्मानही केला.
‘रॉक ऑन 2’ सिनेमात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पुरब कोहली, प्राची देसाई आणि श्रद्ध कपूर अशी कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत आहेत. 11 नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज झाला असून, शुजात सौदागर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
 

४८ तासात देशातील कायदा-सुव्यवस्था गंभीर

नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या ४८ तासात चलन पुरवठा सुरळीत नाही झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी सरकरला दिले आहे. असे वृत्त एबीपी न्युजने दिले आहे. दोन दिवसात एटीएम आणि बँकांमध्ये चलन पुरवठा पुर्वरत न झाल्यास गर्दीला संभाळणे नियंत्रणेबाहेर जाईल.
स्वार्थी आणि असामाजिक तत्व समाजात सक्रिय झाले आहेत. ज्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालं आहे, ते लोक नागरिकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत

Wednesday, November 9, 2016

अफवांवर विश्वास ठेवू नका-नोटा बँकेतच जमा करा: जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याबाबत कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अशा नोटा बँकेमध्ये जावून बदलून घ्याव्यात. त्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अनावश्यक गर्दी टाळून नागरिकांनी बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज केले.
जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक आज घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटीलउपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते.
11 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12.00 वा. पर्यंत रुग्णालय, औषध दुकाने, पेट्रोल, डिझेल, गॅस पंप, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, या ठिकाणी स्वीकारल्या जातील. उद्या
बँकांनी येणाऱ्या ग्राहकांसाठी मराठीमध्ये ठळक सूचना फलक लावावेत. त्याचबरोबर सर्वसामान्य गरजवंताना प्रथम प्राधान्य द्या. मोठ्या ग्राहकांना समजावून सांगा.
सर्व सामान्य जनजीवन सुरळीत रहावे, त्यावर परिणाम होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. नागरिकांनीही घाबरुन जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे. त्या ठिकाणी जावून पाचशे रुपये आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात खातेदार नसणाऱ्या ग्राहकांनाही आपल्या ओळखपत्रासह चार हजार रुपयापर्यंत नोटा बदलून मिळतील. त्यासाठी त्यांचे ओळखपत्र आवश्यक आहे. ऑनलाईन बँकींग, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड याद्वारे नागरिकांनी आपले व्यवहार करावेत. ग्राहकांनीही सांमजस्याने आणि शांततेने उद्या बँकांमध्ये आपले व्यवहार करावेत. त्यासाठी सर्व बँका चांगल्या सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत. पोस्ट खात्यानेही नागरिकांसाठी ठळक अक्षरात सूचना फलक लावावेत. स्टेट बँक ऑंफ इंडियाने येणाऱ्या नव्या नोटा सर्व बँकांना वितरीत करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. मुद्गल यांनी दिल्या. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी उद्या बँकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितलेजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्व सामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या  व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे म्हणाले, बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही काळजी करु नका जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. देशाच्या विकासासाठी घेण्यात आलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यासाठी सर्वांनीच संयम ठेवावा. तुमचे कोणतेही पैसे बुडणार नाहीत ते सुरक्षीत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत पैसे बदलण्यासाठी काही कारणांने शक्य झाले नाही तरी घाबरुन जावू नये. त्यानंतरही आवश्यक कागदपत्रांद्वारे तुमचे पैसे खात्यात जमा करण्यात येणार