विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, November 7, 2016

राष्ट्रवादीच निवडणूक जिंकणार

विधान परिषदेच्या निवडणूकीची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे. तिच्यावर काँग्रेसने दावा करणे चुकीचे ठरले. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक आम्हीच जिंकणार आहे, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही उपदेशाचे कानमंत्र जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकाऱयांना दिल्याने सगळेच सदस्य चार्ज झाले. या बैठकीकडे खासदार उदयनराजे गटाचे सदस्य व काही सभापतींनी गैरहजेरी लावली होती.
राष्ट्रवादी भवनात आयोजित बैठकीला सभापती रामराजे, आमदार शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, महिला व बालकल्याणच्या सभापती वैशाली फडतरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, विजयमाला जगदाळे, डॉ. सुरेखा शेवाळे, मेघना चव्हाण, सारिका अनपट, संजय देसाई, बाळासाहेब भिलारे, किरण साबळे पाटील,                                                                                                                               उमा बुळूंगे, देवराज पाटील, संगीता गुरव, रुपाली जाधव, नितीन भरगुडे पाटील, मनिषा सिंहासने,  मोहनराव शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत कोणीही आर्थिक अमिषे दाखवले व त्याला भुलणाऱयावर वरिष्ठामार्फत कारवाई केली जाईल. त्यामुळे, या निवडणूकीत पक्षांची निष्ठा जोपासून कामाला लागले पाहिजे, असे आदेश सभापती रामराजे नाईक, शशिकांत शिंदे यांनी दिले.
पक्षनिरीक्षकांच्या नेमणूका केल्या
बैठकीत तालुकानिहाय पक्ष निरीक्षकांच्या बैठका करण्यात आल्या. वाईसाठी शिवाजीराव महाडिक, कराडसाठी बाळासाहेब सोळस्कर, फलटणसाठी संभाजीरावव गायकवाड, साताऱयासाठी अमित कदम, महाबळेश्वरसाठी निवास शिंदे, खटावसाठी मानसिंगराव जगदाळे, माणसाठी नितीन भरगुडे – पाटील, पाटणसाठी बाळासाहेब महामुलकर, जावलीसाठी नितीन भोसले, कोरेगावसाठी देवराज पाटील, खंडाळय़ासाठी राजेंद्र लावंघरे, शफीक शेख यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment