विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Wednesday, October 26, 2016

शहराला दिवाळीची चाहूल, खरेदीसाठी गर्दी


आता केवळ तीन दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कपडय़ाबरोबर, उटणे, मोती साबण, तेल याचीही खरेदी जोमात चालली आहे. तर काही जणांचे फराळ करुन पूर्ण झाले आहेत, तर काही जणांच्या घरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.  एकंदर शहराला दिवाळीची चाहूल लागली आहे.

दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे चैतन्य आणि दिवाळी म्हणजे नवीन कपडे. दिवाळी आणि नवीन कपडयांचे अतूट असे समीकरण आहे. साडय़ांच्या दुकानात महिलांनी गर्दी केली आहे. सिल्क, पैठणी, शालू असा साडयांपेक्षा डिझानर साडयांना महिला जास्त पसंती देत आहेत. तर तरुणीमध्ये इंडो वेस्टर्न कुडती, मस्तानी ड्रेसला तर तरुणांमध्ये डेनिमचे शर्ट व वॉश, जॉगर्सच्या जीन्सची क्रेझ आहे.

ऑक्टोबर हा थंडीचा महिना. थंडीत आपली त्वचा उकलते. त्यामुळे तेल व उटणे लावून आंघोळ केल्याने त्वचा चांगली राहते. दिवाळी ही थंडीतच येत असल्याने दिवाळीदिवशी तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. अभंग स्नानासाठी बाजारात अनेक प्रकारचे तेल, साबण, उटणे आले आहेत. साबणामध्ये गुलाब, चंदन, मोती साबणाबरोबरच, केवडा, विभूती, अष्टगंध, उपटण, केसर, कोरफड, तुलसी, जास्मिन, खस, पंचामृत, मध असे प्रकार आले आहेत. तसेच उटण्यात घालण्यासाठी हिना, अलफान्सो, रातराणी, गुलाब अशा प्रकारचे अत्तर बाजारात उपलब्ध झाले आहेत. अभंग स्नानासाठी पूर्वी तीळाचे तेल लावले जात होते. परंतु आता बाजारात वेगवेगळे सुगंधी तेल आले आहेत.

मोबाईल, सोशल नेटवर्किंगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रीटिंग्ज कार्डसना पसंती दिली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतला शुभेच्छापर मजकूर असलेल्या ग्रीटिंजना सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जात आहे. दिवाळीत आपल्या आवडत्या व्यक्ती, नातेवाईक, स्नेही यांना ग्रीटिंग पाठवतो. हा एक आनंद उत्सवाचा भाग असतो. तर सातारा शहरातील अनेक गिफ्ट शॉपी मध्ये शुभेच्छा पत्र आले आहेत. तर 25 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत बाजारात ग्रीटिंग उपलब्ध झाले आहेत. त्यांची खरेदीही होत आहे.

कराडची बाजारपेठ फुलली

कराडः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कराडच्या बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्ते ग्राहकांनी फुलले आहेत.

दिवाळी अवघ्या आठवडाभरावर आलेली असतानाही बाजारपेठेत शांतता असल्याने व्यापाऱयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र सोमवारी दुपारनंतर बाजारपेठे ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱयांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी कराडचा बंद दिवस असतानाही दिवसभर बाजारपेठ सुरू होती. तर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.

दिवाळीचे आकर्षण असणारे विविध रंगरीबेरंगी आकाशकंदील, कपडे, रांगोळी, फटाके, पणत्या आदी प्रकारचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. भेदा चौकातील पालिकेच्या मैदानात फटाका स्टॉलसाठी जागा दिली असून येथे मंडप उभारून स्टॉल उभारण्यात आले आहेत. फटाके खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. कपडय़ांची बाजारपेठही ग्राहकांनी फुलली आहे. लहान मुलांच्या कपडय़ांबरोबरच मोठय़ांचाही रेडिमेड कपडय़ांकडे कल दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कपडय़ांच्या दरात नाममात्र वाढ झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

यावर्षी राज्यभर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या निमित्ताने दिवाळीवरही मराठा क्रांती मोर्च्याची छाप दिसून येत आहे. शहरात लागलेल्या आकाशकंदीलाच्या स्टॉलवर मोठय़ा मराठा आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 20 रूपयांपासून अडीचशे रूपयांपर्यंत वेगवेगळय़ा किमतीत हे आकाशकंदील विकले जात आहेत. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठय़ा प्रमाणात शिरकाव केलेल्या चायना सारख्या परदेशी वस्तुंवर सोशय मिडीयातून मोठय़ा प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला. त्याचा परिणाम बाजारपेठेतील चायना मेड वस्तुवर दिसून येत आहे. यात मोठय़ा प्रमाणात पणत्या, लाईटच्या माळा, फटाक्यांना मार बसला आहे.

सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळानंतर यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱयांसह सर्वस्तरातील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीमध्ये दिसून येत असून मोठी उलाढाल यानिमित्ताने होत आहे.

 


No comments:

Post a Comment